🕒 1 min read
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. या निमित्ताने राज्यासह देशातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा.’ असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलं आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील यांनी विराजमान व्हावं, अशी इच्छा काँग्रेसमधील काही नेत्यांकडून देखील होत असल्याचं दिसून येत आहे.
काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा. @Jayant_R_Patil pic.twitter.com/uLMyh34beU— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 16, 2021
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ‘दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही.’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं होतं.
त्यांच्या या विधानांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप होताच स्पष्टीकरण देखील जयंत पाटील यांना द्यावं लागलं होतं. आता काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी जयंत पाटलांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावं, असं विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
