Share

ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटचे बीड कनेक्शन, अटक टाळण्यासाठी शंतनू मुळूक हायकोर्टात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दिल्ली शेतकरी आंदोलन प्रकरणातील टूलकिटचे बीड कनेक्शन समोर आले आहे. याबाबत काल सोमवारी ‘महाराष्ट्र देशा’ने बातमीही प्रकाशित केली होती. ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी बंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील बीड येथील शंतनू शिवलाल मुळक याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटक टाळण्यासाठी मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर आज मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शनिवारी रात्री साधारण नऊच्या सुमारास दिल्ली सायबर सेलचे पो.नि.सज्जनसिंग व त्यांच्या पथकातील कर्मचारी बीडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने त्यांनी बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस हद्दीबाहेर जावून चौकशी करण्यासाठी संबंधित ठाणे प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार दिल्ली पोलीसांनी शिवाजीनगर ठाण्यात येवून त्यांना हव्या असलेल्या संशयितांच्या पत्त्याबाबत तसेच अधिकची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याकडून जाणून घेत शहरातील काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली.

दरम्यान,अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या निकिता जेकब यांच्या विरोधातदेखील अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून, पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!