🕒 1 min read
चेन्नई : भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा अश्विनने आपल्या नावावर केल्या. पण त्याचबरोबर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने आपलाच एक विक्रम मोडी काढल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता.
इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण कालच्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला. आणि नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अश्विनच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अश्विनच्या या कामगिरीवर त्याची पत्नी प्रिथी सुद्धा भलतीच खुश आहे.
प्रिथीने अश्विनच्या शानदार खेळीनंतर ट्विट करून लिहिले आहे की, ‘माझा पती सर्वांना ट्रोल करत आहे.’ तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊन चाहत्यांना देखील फार आवडले. त्यामुळे या ट्विटला लगातार प्रतिक्रिया येत आहेत.
https://twitter.com/prithinarayanan/status/1361216097383567362?s=20
अश्विनला भारताच्या दुसऱ्या डावात दोन वेळा जीवनदान मिळाले, ज्याचा फायदा उचलत त्याने आपले शतक पूर्ण करून १०६ धावा काढल्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २८६ धावा काढून समाप्त झाला असून इंग्लंडपुढे भारताने ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय कर्णधार विराट कोहलीसमवेत त्याने ९६ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या या डावादरम्यान इंग्लंडच्या मोईन अलीने चार विकेट्स हस्तगत केल्या आहेत. सोबतच जॅक लीचनेही ४ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३३० धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु पहिल्या डावात अवघ्या १३४ धावात इंग्लंडचा संघ गारद झाला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात १९५ धावांची मोठी आघाडी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
- धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, गंभीर आरोपांनंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे
- हिगोली जिल्ह्याला १६० कोटींच्या आराखड्यास मंजूरी; ५८.३२ कोटींची अतिरिक्त निधी
- ‘राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही; गुन्हाही दाखल व्हावा’
- …म्हणून ग्रेटा थनबर्गने ‘ते’ ट्वीट डिलीट केलं ; पोलिसांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
