Share

चौघांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ विहिरीजवळ अखेर स्पीड ब्रेकर, लोखंडी पोल बसवले

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना -देऊळगावराजा मार्गावर रोडला लागून असलेल्या विहिरीत दोन वेळा कार जाऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. या रोडवर अखेर स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहे. शिवाय विहिरीजवळ रस्त्याच्या कडेने असलेला मातीचा ढिग काढून त्याठिकाणी लोखांडी पोल आणि दोन्ही बाजूंनी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

जालना – देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी परिसरातील विहिरीत वाहनधारकांसाठी ‘मौत का कुआं’बनली होती. रोडलगत असलेल्या या वहिरीत गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कार पडून चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बांदकाम विभागाने याठिकाणी खडलेले दुसऱ्या बाजूचेही काम सुरू केले आहे. जामवाडीजवळ एका व्यावसायिकाने कँटीन हटवली नसल्याने हे काम वर्षभरापासून थांबलेले होते. संबंधित गुत्तेदाराकडे असलेले ४० किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे, मात्र, या परिसरातील केवळ १३० मीटरचे काम थांबले होते. त्यामुळे या ठिकाणाहून एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.

पंधरा दिवसांत पूल तयार होणार
दरम्यान, दोन अपघात झाल्यानंतर जामवाडीतील ग्रामस्थांनी रस्ता रोको करून याठिकाणी तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवदेन जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरकडकर यांना दिले होते. त्यानंतर या ठिकाणी लोखंडी पोल लावण्यात आले असून रखडलेले दुसऱ्या बाजूचेही काम देखील सुरू करण्यात आले आहे. पंधरा दिवसांत हा पूल तयार होऊन या ठिकाणी बॅरिकेड्सही लावण्यात येतील अशी माहिती डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!