बीड : देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. यातच आता गॅसचे दर तब्बल ५० रुपयांनी वाढलेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. नुकतेच केंद्रिय अर्थसंकल्प सादर करून मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत असल्याचे सांगितले होते. मात्र, केंद्र सरकार हवेतच असून नागरिकांना ‘गॅस’वर ठेवण्यात आल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीडमध्ये गॅस सिलेंडरसाठी ७९५ रुपये आता ग्राहकांना मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. तर मागील दहा दिवसांत ७५ रुपयांनी तर दीड महिन्यात पावणे दोनशे रुपयांनी गॅस महागला.
कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत. सोमवार मध्यरात्रीपासून बीडमध्ये गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७९५ रुपये मोजावे लागले. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता सिलिंडर आठशे रुपयांचा घरात गेले आहे.दरम्यान वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असतानाच घरगुती गॅस सिलिंडरनेही जोराचा झटका दिलेला आहे. या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दीड महिन्यात १७५ रुपयांची वाढ
गॅस सिलिंडरच्या किंमतीत डिसेंबरपासून वाढ होत आहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १५ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू
- मुंबई मनपा निवडणुकीसाठी नाना पटोलेंनी दिला ‘स्वबळाचा नारा’
- बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76.5% रुग्ण ‘या’ तीन राज्यात
- ‘भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
