औरंगाबाद : अर्थसंकल्पाच्या आढावा संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात होते. आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक पक्षांनी शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. मनसे अजित पवारांना नामांतर संदर्भात आंदोलन अथवा निवेदन देते का ? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. परंतु अजित पवारांसमोर मनसेची नामांतराची तलवार म्यान झाली असल्याच चर्चा शहरात सुरु होती.
स्मार्ट सिटी अंतर्गत मनपाने लव औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर फलक लावले, त्यालाच अनुसरून भाजप, मनसेने नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला होता. यासाठी मनसेने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रक फेकले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शहराच्या दौऱ्यावर असताना, पोलिसांनी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक केली होती.
अर्थसंकल्पीय आढावा बैठकीसाठी शहरात आज मंत्र्यांची फौज असताना, मनसेने नामांतराचा मुद्दा थंड बस्त्यात ठेवत, नामांतर मुद्द्यासाठी काहीच केले नाही. या संदर्भात महाराष्ट्र देशाने मनसे पदाधिकारी संदीप कुलकर्णी यांना विचारणा केली असता. त्यांनी मागे मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आज काही केले नसल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू
- मुंबई मनपा निवडणुकीसाठी नाना पटोलेंनी दिला ‘स्वबळाचा नारा’
- बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76.5% रुग्ण ‘या’ तीन राज्यात
- ‘भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
