🕒 1 min read
बीड : भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक ठार झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता केज तालुक्यातील होळजवळ घडली. या प्रकरणी क्रुझर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या धायगुडा पिंपळालगतच्या टिव्ही सेंटरजवळ शिवशाही बस पलटी झाल्याने तीन प्रवाशी किरकोळ जखमी झालेत.
पहिल्या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनूसार, अजिंक्य दत्ता धस (वय २०), महेंद्र भिमराव घुगे (वय २०, रा.दोघे होळ ता.केज) हे दुचाकी क्र. एमएच ४४ व्ही २१८९ यावर लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात होते. केज-अंबाजोगाई रोडवर होळजवळ या तरुणांच्या मोटार सायकलला समोरून येणाऱ्या क्रुझर गाडी (एमएच २४ व्ही ४४८९)ने जोराची धडक दिली. यात अजिंक्य धस हा तरूण जागीच ठार झाला. तर महेंद्र घुगे याला उपचारासाठी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती युसूफवडगांव पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी अपघाताची घटना अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या धायगुडा पिंपळा जवळील टिव्ही सेंटर जवळ घडली. एसटी महामंडळाची शिवशाही ही बस क्र.एमएच ०६ बीडब्ल्यु ४३८१ पलटी झाली. या अपघातात तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. सदरील बसमध्ये पंधरा प्रवाशी होते असे सांगण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू
- मुंबई मनपा निवडणुकीसाठी नाना पटोलेंनी दिला ‘स्वबळाचा नारा’
- बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76.5% रुग्ण ‘या’ तीन राज्यात
- ‘भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
