Share

‘पडळकरांचं वय किती पवार साहेबांचा अनुभव किती’

Published On: 

🕒 1 min read

सांगली : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले आहे.

मात्र, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं होते. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली होती.

‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पडळकरांचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचं वय किती पवार साहेबांचा अनुभव किती, अशा शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला आहे. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

पवार जातीयवादी आहेत. त्यांच्या हातून अहिल्याबाईच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका घेत पडळकरांनी पवारांवर शाब्दिक प्रहार केले. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी पडळकरांचा खरपूस समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!