🕒 1 min read
वैजापूर : वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदी आशाबाई रामनाथ धामणे व उपसरपंचपदी मंदा नानासाहेब थोरात यांची शुक्रवारी (दि. १२) बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत अन्नपुर्णा माता विकास आघाडी पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे.
सरपंच उपसरपंच पदाची निवड आरक्षण प्रक्रीयेमुळे लांबणीवर पडली होती. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून ए.डी. कौसडीकर , ग्रामसेवक मनिषा वाघमारे, तलाठी श्रीकांत म्हस्के, पोलिस पाटील स्वाती गणेश कदम, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदीच्या उपस्थितीत शांततेत विशेष सभा पार पडली.
सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदी महिलांची निवड झाल्याने गावातील महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य माधुरी गिरी, योगीता थोरात, सुवर्णा त्रिभुवन, सोमनाथ सोनवणे, जिवन त्रिभुवन, विकास आदमणे, जेष्ठ नागरिक मारूती थोरात, गणपत थोरात, गोरक थोरात, सुभाष आंबेकर. विश्वास सोनवणे, अशोक रोहम, एकनाथ खरमाळे, ज्ञानदेव कदम, बाळासाहेब कदम, गोकुळ पंडित, दत्ता धामणे, दिपक बरकसे, दत्ता थोरात, तुषार थोरात, सुनिल थोरात, बापु थोरात, सतिश थोरात, रेवन थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- शिक्षण मंत्री महोदया कृपया हे थांबवा…आमदारांचा घरचा आहेर
- मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही
- लातुर मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना लस
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
