🕒 1 min read
औरंगाबाद : गहाळ झालेला ३४६ क्विंटल मका गोदामात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बहुचर्चित प्रकरणात चौकशीचे आदेश झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली आहे. मुदत संपल्याने खरेदी विक्री संघाने खरेदी करून न केलेली शेतकऱ्यांची तब्बल ३४६ क्विंटल मका गोदामातुन गहाळ झाल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघडकिस आला होता. याप्रकरणी तहसिलदारांनी वैजापूर सज्जाचे तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना नोटीस बजावुन पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मनोहर वाणी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी सुरू झाल्यानंतर अचानक गोदामात ३४६ क्विंटल मका आढळुन आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घायगाव येथील भाग्योदय जिनींग मीलच्या गोदामातुन जवळपास सहा लाख रुपये किमतीची ही मका गहाळ झाल्याने मका उत्पादक हवालदिल झाले होते. मका गहाळ झाल्यानंतर सर्वच यंञणा कामाला लागली. खरेदी विक्री संघ व तहसील प्रशासनामध्ये तुतू. .मैमै सुरू झाली. लाॅट एंट्री न झाल्यामुळे मका खरेदी झाली नाही. ही संघाची भुमिका होती. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचा मका तसाच पडून राहिला. मका गोदामातच होते सांगून प्रकरण सावरण्यात आले.
काय होते नेमके प्रकरण?
जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खरेदी – विक्री संघाच्यावतीने २०१९-२० मध्ये मका खरेदी करण्यात आली. शासनाचे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी बंद केली. त्यानंतर पूर्ण मका तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. या गोदामातून ३४३ क्विंटल मका गहाळ झाल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी उघडकीस आला. सुरुवातीला गोदामातून गायब झालेल्या मक्याबाबत कुणीच उत्तरदायित्व स्वीकारायला तयार नसल्यामुळे हा मका नेमका गेला कुठे? याबाबत गूढ वाढले होते. शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन हादरले त्यानंतर या मक्याची चौकशी करून मका त्याच ठिकाणी होता. असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
