Share

परवाना शुल्कवाढ अन्यायकारक, रद्द करण्यासाठी व्यापारी महासंघाचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारामार्फत परवाना शुल्क वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन कराबद्दल व्यापारी वर्गातून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा नवीन कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज (दि. १३) औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदर शुल्क वाढ वसुली रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

महानगरपालिकेतर्फे उत्पन्नवाढीकरीता नवीन परवाना शुल्क वसुलीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यास औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा सक्त विरोध आहे. आयकर, जीएसटी, अन्न व औषध प्रशासन, मनपा कमर्शियल टॅक्स इत्यादी प्रकारचे कर व्यापारी आधीपासूनच भरतात. त्यात या नवीन कराची भर कशाला? असा सवाल त्यांनी आधीच उपस्थित केला आहे.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता शासनाच्या निर्देशानुसार बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या बंदच्या काळामध्ये शहरातील नागरीकांना, उद्योजकांना व्यापारी बांधवांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. महानगरपालिकेतर्फे अशा आर्थिक
अडचणीच्या काळामध्ये अशा प्रकारे नवीन कर तसुली करणे अन्यायकारक्त आहे. अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. तरी आमच्या मागणीचा योग्य विचार करुन सदर शुल्क वाढ वसुली रद्द करण्यात यावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. यावेळी सचिव लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष कॅट अजय शाह, अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!