बीड : आजतागायत केवळ नेत्यांचे वा तथाकथित समाजसेवकांच्या बॅनर आपण पाहात आलो आहोत. अर्थात त्या बॅनरमध्ये कधीकधी वाँटेड आरोपीही असतात. मात्र त्यांचे चेलेचपाटे कौतूकाने त्यांचे बॅनर लावतात. पण यापुढे बीड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांसमोर विविध गुन्ह्यात वाँटेड आणि फरार असलेल्या आरोपींच्या नावांचे बॅनर झळकणार आहेत. त्याचबरोबर या आरोपींना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बक्षीस दिले जाईल आणि आरोपींची माहिती देणाऱ्याचाही प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.
नुकतीच जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी पार पडली. यामध्ये आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिसांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. गुरुवारी पोलिस अधीक्षक आर. राजा यांनीही जिल्ह्याची नियमित गुन्हे आढावा बैठक घेतली. यामध्येही वाँटेड आरोपींना पकडण्यासाठीच्या विशेष मोहिमेबाबत रूपरेषा ठरवण्यात आली आहे.
जिल्ह्यात वाँटेड असलेल्या आरोपींची संख्या सुमारे १ हजार ८०० इतकी आहे. पण यातील काही आरोपी हे इतर जिल्ह्यातील तसेच परराज्यांतील आहेत. मात्र, सध्या तरी जिल्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात वाँटेड असलेल्या आरोपींची संख्या सुमारे १ हजार ५४ इतकी आहे तर, फरार घोषित करण्यात आलेल्यांची संख्या ११९ आहे. ८२ जणांविरोधात स्टॅडिंग वॉरंट आहे. या सगळ्या आरोपींच्या पत्त्यांनुसार ज्या ठाण्याच्या हद्दीत ते वास्तव्यात आहे तेथील ठाण्याला याची माहिती दिली गेली आहे. सर्व ठाण्यांना याबाबतच्या याद्या पाठवण्यात आल्या आहेत. या याद्यांचा फ्लेक्स तयार करून तो ठाण्यासमोर लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
महत्वाच्या बातम्या
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- ‘राज्यपालांचे करायचे काय ?’; ‘तीच तुमची खरी अडचण आहे’
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
