Share

जागतिक रेडिओ दिन : रेडिओ आणि तरुणाईचं नातं

Published On: 

🕒 1 min read

कानपुर : जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. रेडिओबाबतच्या ‘पुढील’ गोष्टी माहिती आहेत का? ‘युनेस्को’ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. भारतात १९२७ मध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले.

भारतात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट १९२१ मध्ये ‘टाइम्स’च्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे. गेल्या ९३ वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. अर्थात काळानुसार त्यात बदल झाले. रेडिओची भाषा बदलली.

निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते. महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. पण प्रवासाचा वेळ जेवढा वाढत आहे, तेवढं रेडिओ ऐकण्याचं प्रमाणही वाढत आहे. म्हणूनच नवनवे रेडिओ चॅनेल्स येतच आहेत. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली आहे. काही विद्यापीठांचेदेखील स्वत:चे कम्युनिटी रेडिओ आहेत. सध्यस्थितीत भारतात सुमारे २५१ कम्युनिटी रेडिओ आहेत. त्यापैकी भारतात २२ आहेत.

सध्या सर्वत्र तरुणाईला रेडिओने भुरळ पाडली आहे. सध्या तरुणाईमध्ये रेडिओ खूप फेमस झालं आहे. तरुणाई प्रवास करताना अथवा काम करताना रेडिओ ऐकला जातो. यातच नवनवीन रोडिओ जॉकींचे व्हिडिओ समोर येत असतात. दरम्यान अशातच एका RJ चा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओला तरुणाईने खूप पसंत केले आणि रातोरात या RJ ला फेमस करून टाकले. याच्या या व्हायरल व्हिडिओज वरती लाईक्सचा पाऊस पडत आहे.

https://www.instagram.com/p/CKeOc7_j6mq/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!