Share

लोकसहभाग मोहिमेला सीईओ वगळता, आयुक्तांसह लोकप्रतिनिधिंची बगल

Published On: 

औरंगाबाद : माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत ‘माझी खाम, स्वच्छ खाम’ मोहिमेसाठी लोकसहभागातून खाम नदीला पुनर्जीवित करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. यासाठी शनिवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला मनपा आयुक्तांसह लोक प्रतिनिधींनी पाठ दाखवत, हा कार्यक्रम एकट्या छावणी परिषदेच्या सीईओंच्या हस्ते पार पडला.

खाम नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावत आहे. लोकसहभागाला चालना मिळावी म्हणून मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत खाम नदीकाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. तसाच वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी पार पडला याची पत्रिका अधिकृत पत्रिकाही तयार करण्यात आली होती.

मात्र, पत्रिकेत विनीत असलेले मनपा आयुक्तांनी कार्यक्रमाला दांडी मारली, तर छावणी परिषदेचे सीईओ कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. यात पत्रिकेतील विशेष निमंत्रित असलेले लोक प्रतिनिधी देखील कार्यक्रमाला न येता त्यांनी पाठ फिरवली. त्यात मात्र, छावणी परिषदेच्या सीईओंनी वेळ मारून नेत, त्यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वामखेडे यांच्यासह वृक्षारोपण कार्यक्रम करून घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!