Share

महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली . ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं, या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे.भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान,हे प्रकरण आता चांगलेच चिघळले असून महाविकास आघाडी सरकार महिनाभरात पुन्हा एकदा अडचणींचा सामना करत आहे. नुकताच धनंजय मुंडे यांच्याबाबतचा देखील एक वाद समोर आला होता त्यावेळी सुद्धा सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती आता या प्रकरणात देखील सरकारसमोरील अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे अनेक पुढारी या प्रकरणात गप्प बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महिलांच्या प्रश्नांवरून मोदी-योगींना प्रश्न विचारात आंदोलन करणाऱ्या महिला नेत्या देखील आज मूग गिळून गप्प बसल्या आहेत. थोर महापुरुषांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील कथित पुरोगामी नेते गप्प बसून जे काही गैरप्रकार सुरु आहेत त्यास मूकसंमती देत आहेत का असा सवाल आज उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!