Share

नोकरी बदलण्यात महिन्याचे अंतर असल्यास पीएफवरील करावर होणार परिणाम

Published On: 

नवी दिल्लीः १ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नोकरदारांच्या ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भात घोषणा केली आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंदर्भात 2021 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलीय. आधी सांगितल्याप्रमाणे पीएफमध्ये गुंतवणुकीसाठी 80 सी अंतर्गत कर कपातीचा फायदा, व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे आणि ही रक्कम पाच वर्षांनंतर पैसे काढल्यानंतर करमुक्तदेखील आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आर्थिक वर्षात ईपीएफमध्ये अडीच लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असेल. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास अतिरिक्त रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल. आतापर्यंत व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होते.

या घोषणेनंतर अनेकांना आपल्या ईपीएफ वर कर आकारणी होणार असल्याच चिंता निर्माण झाली आहे. ईपीएफ पैसे काढण्यावरील कर आकारणीसाठी 5 वर्षांचा कालावधी खूप महत्त्वाचा ठरतो. जर आपण सलग पाच वर्षे काम केले असेल, तर या सेवानिवृत्ती निधीतून पैसे काढण्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. या काळात जरी आपण नोकरी बदलली तरी करात सवलत मिळू शकते. परंतु दोन नोकऱ्यांत महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये. जुन्या मालकाचा भविष्य निर्वाह निधी नव्या कंपनीकडे नियोक्ताकडे वर्ग करावा लागेल हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. यासह योगदान आपल्या पीएफ खात्यात सुरूच राहील आणि त्याची गणना एकत्र केली जाईल.

दरम्यान ईपीएफमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कलम 80 सी अंतर्गत कर कपातीचा फायदा होतो. पैसे काढल्यास ते पूर्णपणे करमुक्त होऊ शकतात, परंतु त्याबद्दल एक अट आहे. सध्या ईपीएफवरील व्याज दर 8.5 टक्के असून, व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. आपण सेवेची पाच वर्षे पूर्ण न केल्यास आणि त्यापूर्वी या निधीतून पैसे काढू इच्छित असल्यास कर आकारला जाईल. 50 हजारांपेक्षा कमी रक्कम काढण्यासाठी टीडीएस कपात केली जाणार नाही, परंतु ती आपल्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केली जाईल आणि आपण ज्या टॅक्समध्ये येतो त्यानुसार कर भरावा लागेल. 50 हजारांहून अधिक रक्कम काढण्यासाठी 10 टक्के टीडीएस वजा केला जातो. जर आपण 5 वर्षे सेवा संपल्यानंतर पैसे काढल्यास ते पूर्णपणे करमुक्त आहे. जर कंपनी पाच वर्षांपूर्वी बंद झाल्यास योगदानाची प्रक्रिया बिघडते, अशा परिस्थितीत 5 वर्षांपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही कर वजा केला जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!