🕒 1 min read
औरंगाबाद : घर किरायाने घ्यायचे सांगून शहरातील एका घरमालकाची तब्बल 82 हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने घरमालकाला आपण केंद्रीय सुरक्षा दलात नोकरीला असल्याचे सांगून त्यांना काही कागदपत्रे व्हॉटसअपवर पाठवत विश्वास संपादन केला होता.
गारखेडा परिसरात राहत असलेले रोहित पुरुषोत्तम शाह (वय ६५, रा. श्रीजी हॉस्पीटल, नाथ प्रांगण, गारखेडा परिसर) यांची 6 ते 11 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन फसवणूक झाली. रोहित पुरुषोत्तम शाह यांना भामट्याने ६ फेब्रुवारीला सकाळी अकराच्या सुमारास फोन करून मी केंद्रीय सुरक्षा बलात नोकरीला आहे. किरायाने फ्लॅट घ्यायचा आहे, असे सांगितले.
यासाठी आरोपीने आधार कार्ड, पॅन कार्ड शाह यांच्या मोबाइलवर पाठवले. त्यामुळे शाह यांचा भामट्यावर विश्वास बसला. त्यानंतर भामट्याने त्यांना किरायाचे पैसे ऑनलाइन पाठवतो, असे सांगून स्वत:चा क्यूआर कोड फोन पेद्वारे पाठवला. तो कोड शाह यांनी स्कॅन करताच त्यांच्या खात्यातील 82 हजारांची रोकड भामट्याच्या खात्यात जमा झाली. हा प्रकार समोर आल्यावर शाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
