Share

तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत आतापर्यंत मृतांची संख्या 11 झाली आहे, तर 36 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना 1 लाख रुपये जाहीर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फटाका कारखान्यातील स्फोटात मृत पावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील फटाका कारखान्यात लागलेली आगीची घटना दुःखदायक आहे. या घटनेतील मृतांबद्दल माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होतील, ही आशा आहे. अधिकारी प्रभावित झालेल्यांची मदत करण्यासाठी काम करत आहेत.

पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत

विरुधुनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

राहुल गांधींचे राज्य सरकारला मदतीचे आवाहन

तामिळनाडूतील अग्निशामक दुर्घटनेसंदर्भात त्वरित मदतीसाठी राहुल गांधींनी राज्य सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाका फॅक्टरीतील स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना. जे अजूनही आत अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना. राज्य सरकारला तातडीने बचाव, मदत देण्याचे मी आवाहन करतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!