🕒 1 min read
बीड : येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कुंपनानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या मुद्देमालात ६० हजार ११० रुपयांचा अपहार करून गुन्हे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी हवालदार मनोहर काकडे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकडे हे शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासोबतच जप्त मुद्देमालाची निर्गती करण्याचे आदेश एसपींनी दिले होते. मात्र, शिवाजीनगर ठाण्यातील हवालदार काकडे यांनी २०१३ पासून सात गुन्हे प्रलंबित ठेऊन त्यात जप्त केलेल्या ६० हजार ११० रुपयांच्या रकमेचा अपहार केला.
शिवाय तपास प्रलंबित ठेऊन आरोपींना सहकार्य करत कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका ठेऊन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी अहवाल पोलीस अधीक्षक आर. राजा यांना पाठविला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून काकडे यांच्याविरुध्द बीड शहर ठाण्यात महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट २००५ नुसार गुन्हा नोंद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- आजपासून 2000 रुपयांचं डिस्काऊंटसह खरेदी करा रीअलमीचा ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार

