🕒 1 min read
नवी दिल्ली : बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे (टीएमसी) खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अचानक राज्यसभेचा राजीनामा दिला. राज्यसभेतील सभागृहाच्या कार्यकाळातच त्यांनी राजीनामा जाहीर केला. यादरम्यान त्रिवेदी म्हणाले की, ‘पक्षात माझा जीव गुदमरत असल्याने मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.’
विशेष म्हणजे, दिनेश त्रिवेदींना तृणमूलमध्ये हिंदी भाषकांचा एक मोठा चेहरा मानला जाते. गतवर्षी तृणमूलने राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांना वरच्या सभागृहात पाठवले होते. या घटनेला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते की त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. 2012 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या दबावाखाली त्यांना तेव्हा रेल्वेमंत्रिपदाचा म्हणून राजीनामा द्यावा लागला होता.
मागच्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. तृणमूल कॉंग्रेसचे अनेक आमदार, दोन मोठे मंत्री आणि एका लोकसभेच्या खासदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजीनामा दिल्यानंतर आता दिनेश त्रिवेदी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
