🕒 1 min read
चेन्नई : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरी कसोटी शनिवारपासून सुरू होईल. या कसोटीच्या आधीच एक मोठी बातमी येत आहे. भारताला दिलासा देणारी तर पाहुण्या संघाला धक्का देणारी ही बातमी आहे. अष्टपैलू अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला अंतिम अकराच्या संघात खेळता आले नाही. आता मात्र अक्षर फिट असल्याने त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं. असं झालं तर नदीम आणि राहुल चहर या दोघांना पुन्हा राखीव खेळाडू म्हणून बसवावं लागेल.
दुसरी बातमी इंग्लंड संघातून आलेली आहे. त्यांच्या संघाला धक्का देणारी ही बातमी आहे. इंग्लंडचा आक्रमणाची धार या धक्क्याने कमी होऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव करण्यात इंग्लिश गोलंदाजांचा मोठा वाटा होता. आता या ब्रिटीश फौजेतला नामी वीरच पुढच्या कसोटीसाठी नसणार आहे.
इंग्लंडचा मुख्य आधार असलेला खेळाडूच आता पुढची कसोटी खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जोफ्रा आर्चर आता 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपराला इंजेक्शन दिल्यामुळे ते सुजलं आहे. या दुखापतीमुळे तो शनिवारपासून सुरू होणारा सामना खेळू शकणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल
- ‘नाव मोठे पण काम…’ ; ‘या’ तीन खेळाडूंची आयपीएलमधून होऊ शकते सुट्टी
- ‘जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातची कठपुतळी तर बनली नाही ना ?’
- ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूवर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
