🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची कोणत्याही संघात निवड होणे कठीण आहे.
जेम्स नीशम, आयपीएल २०२० च्या सत्रात किंग्स इलेव्हेन पंजाब संघातून खेळलेला जेम्स नीशम याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. परंतु त्याने असे काहीच केले नाही. पंजाब संघासाठी नीशम याने ५ सामने खेळले. यात त्याने अवघ्या १९ धावा केल्या. तसेच गोलंदाजी मध्ये त्याला फक्त २ गडी बाद करण्यात यश आले. जेम्स नीशमच्या या प्रदर्शनामुळे कोणता कोणत्याही संघात समावेश होणे कठीण दिसत आहे.
स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम केले आहेत. परंतु आयपीएल स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यास त्याला अपयश आले आहे. २०२० च्या आयपीएल सत्रात स्टीव्ह स्मिथ याला राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु काही सामन्यानंतर पुन्हा काढून घेण्यात आले. २०२१ च्या आयपीएल सत्रासाठी राजस्थान रॉयल्स संघातून स्टीव्ह स्मिथ याला रिलीज केले आहे.
केदार जाधव भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने भारतीय संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यास अपयश आले आहे. आयपीएल २०२० मध्ये देखील त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना फॉर्म गवसला नाही. यामुळेच आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघाने केदार जाधवला रिलीज केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यंदा शाळा-महाविद्यालयांमध्ये होणार छत्रपती शिवचरित्र पारायण
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- ‘देशाच्या पाठीचा कणा मोडून दोन मित्रांना देण्याचा मोदींचा डाव’
- शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या महावितरणविरोधात मनसे आक्रमक
- ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूवर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
