🕒 1 min read
लडाख : भारतावर कुरघोडी करणं ही चिनी ड्रॅगनची जुनीच सवय आहे. गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन मध्ये संघर्ष वाढला होता. कोरोना काळात देखील चीनने भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकाला भिडलं देखील होतं. यात भारताचे २० जवान शहिद झाले होते. तर, याहून दुप्पट चिनी सैनिकांना भारतीय फौजेने यमसदनी धाडलं होतं.
दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये तब्बल आठ चर्चेचा फेऱ्या झाल्या. तर, नवव्या फेरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यानुसार भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने देखील याबाबत घोषणा केली आहे. आज राज्यसभेतबोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील याबाबाबत माहिती आली आहे.
यानंतर, आता LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशाच्या सैन्याने मागे फिरण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे फोटो व व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. दोन्ही देशातील वाढत तणाव लक्षात घेता, दोन्ही देशांनी या सीमाभागात रणगाडे तैनात ठेवले होते. चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य LAC भागात तैनात केल्यानंतर भारताने देखील चोख तयारी दाखवत मोठी फौज तैनात केली होती. आता तब्बल वर्षभराने दोन्ही देशाचे सैन्य माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे.
Pics of Indian and Chinese troops and tanks disengaging from the banks of Pangong lake area in Eastern Ladakh where they had been deployed opposite each other for almost ten months now.
(Pics Source: Indian Army) pic.twitter.com/Dl80EWXXjq
— ANI (@ANI) February 11, 2021
भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही – संरक्षण मंत्री
भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारतानं काहीच गमावलेलं नाही, असा खुलासा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत केला आहे.
भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. सप्टेंबर 2020 पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीन फिंगर 8 आणि भारत फिंगर 3 या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे, असं देखील राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नेत्याच्या अहंकारामुळेच चळवळीचा घात, भुयारांच्या भेटीनंतर सदाभाऊंचा राजू शेट्टींवर प्रहार
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- ‘देशाच्या पाठीचा कणा मोडून दोन मित्रांना देण्याचा मोदींचा डाव’
- शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या महावितरणविरोधात मनसे आक्रमक
- ‘ठाकरे सरकार नशा बहाद्दरांचे आहे, उत्सवप्रेमींचे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
