Share

यंदा शाळा-महाविद्यालयांमध्ये होणार छत्रपती शिवचरित्र पारायण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दरवर्षी शिवजयंती निमित्त क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीच्या वतीने आयोजित होणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मात्र, क्रांती चौकात गर्दी न करता यंदा शाळा आणि महाविद्यालयांमधून शिवचरित्र पारायण केले जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

समाजामध्ये समता, बंधूता, एकता प्रस्थापित व्हावी आणि धर्माधर्मातील अंतर कमी व्हावे, एकमेकांच्या धर्मग्रंथाचे वाचन, परिचय व्हावा म्हणून गेल्या चार वर्षांपासून हा सोहळा आयोजित करण्यात येतो. या सात दिवसांमध्ये एक दिवस भारतीय संविधान, एक दिवस कुराण ग्रंथाचेही वाचन करण्यात येणार आहे. तसेच दररोज सांस्कृतीक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात दररोज १५ ते २० शाळा किंवा महाविद्यालये सहभागी होणार आहेत.

या सप्ताहादरम्यान दिनांक १३ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकातून सर्व धर्मीय ग्रंथ दिंडी काढली जाईल. त्या नंतर सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी पारायणाला सुरूवात होईल. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करूनच दिनांक १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमादरम्यान निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांना बक्षीसे देखील दिली जाणार आहेत. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!