लातूर : जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामध्ये 70 टक्के स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. सुधाकर श्रृंगारे यांनी संसदेत केली. लातूर येथे रेल्वे कोच कारखान्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या कारखान्यात पहिलावहिला कोच काही दिवसांपूर्वीच तयार झाला आहे. कारखान्यात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनेक वर्षांपासून पाण्याअभावी लातूरचे हाल झाले आहेत. दुष्काळाचे चटके सर्वाधिक या जिल्ह्याने सहन केले आहेत. पाणी नसल्याने कोणताही मोठा उद्योग जिल्ह्यात आला नव्हता. येथील तरुणांना मुंबई, पुणे अशा ठिकाणी रोजगारासाठी जावे लागते. परंतु कोच कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो, असे मतही त्यांनी मांडले.
लातूर जिल्हा केवळ औद्योगिक विकासाच्या बाबतीतच नव्हे तर आर्थिक विकासाच्या बाबतीतही मागे राहिलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. लातूरच्या रेल्वे कारखान्याला लागणारा कच्चा माल व त्यावर आधारित कामे, साहित्य व गरजेची माहिती लवकरात लवकर स्थानिक लोकांना उपलब्ध करून द्यावी. यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांची उभारणी होईल आणि स्थानिक पातळीवर कोच कारखान्याला आवश्यकतेनुसार पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे खासदार श्रुंगारे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- निर्मलाताई अर्थखातं कसं चालतं याचं अजित दादांकडून मार्गदर्शन घ्या – सुप्रिया सुळे
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
