Share

‘देशाच्या पाठीचा कणा मोडून दोन मित्रांना देण्याचा मोदींचा डाव’

Published On: 

नवी दिल्ली : ७७ दिवस उलटून देखील शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. विरोधकांनी यावरून सरकारला घेरल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारवर होणाऱ्या आरोपांचा खंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. मोदींनी काल लोकसभेत प्रदीर्घ भाषण केल. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होता. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवत, कॉंग्रेसवर सडकून टीका केली होती.

‘सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही’, असे म्हणत नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर निशाना साधला होता. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे’, असाही त्यांनी टोला लगावला होता.

याचे पडसात आज लोकसभेत दिसून आले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘हे सरकार हम दो, हमारे दोचं सरकार आहे. देशाच्या पाठीचा कणा मोडून दोन मित्रांना देण्याचा मोदींचा डाव आहे’, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणादरम्यान केली.

‘नोटबंदी हा पहिला हल्ला होता’, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘गब्बरसिंग टॅक्सनेही लोकांना लुटलं. गरीबांचा पैसा घेणं हाच नोटबंदीचा उद्देश होता. हा सगळा पैसा दोन व्यक्तींच्या घशात घातला. देश फक्त ४ जण चालवतात’, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!