Share

छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत, याहून दुर्दैव नाही ! भाजपची राज्य सरकारवर टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती प्रदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते.

मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच आयोजनाची तयारी झाली आहे. मात्र, बुधवारी राज्यातील कोरोना रुगणांचा आकडा वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘छत्रपतींच्या महाराष्ट्रातच शिवजयंतीवर निर्बंध यावेत, याहून दुर्दैव नाही. महाविकास आघाडीतील पक्षांचे मेळावे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. राष्ट्रवादीची संवाद यात्रा देखील सुरु आहे, मग शिवजयंती साजरी करण्यावर हे बंधने का ? ‘ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांवर जनता प्रेम करते. महाराजांवरील निष्ठा जपत शिवभक्तांनी स्वतःहून योग्य ती काळजी घेऊन हा उत्सव साजरा केला असता.’ अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!