उस्मानाबाद : अनेक दिवसापासुन तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणास आखेर मंजुरी मिळाली आहे. नगरविकास मंत्र्याच्या बैठकीत सुशोभीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आले आहे. बैठकीच्या वेळी अनेक शिवभक्त उपस्थित होते. या निर्णयानंतर तुळजापुरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, छावासह अनेक शिवभक्तांनी जल्लोष केला.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पाठपुरावा करून सुशोभीकरणासंदर्भात सर्व शासकीय मंजुरी मिळवल्या होत्या. परंतु, नगर विकास विभागाची मंजुरी राजकीय साठमारीत अडकल्याने शेवटी नगराध्यक्ष रोचकरी यांना उपोषणाचा इशारा द्यावा लागला. याच मागणीसाठी विरोधी पक्षांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. गुरुवारी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार होते. पण सुशोभीकरणास मंजुरी मिळाल्यामुळे आनंदोत्सव साजरा केला जात आहे पण दुसरीकडे या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही पुढे सरसावल्याने आहे.
उमरग्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत नगर विकास मंत्र्यांनी बैठक घेऊन सुशोभीकरणाच्या कामास मान्यता दिली तसेच यासाठी ७७. ८४ लाख रुपये मंजूर केले. नगर विकास विभागाची मंजुरी मिळाल्याने शिवरायांचा पुतळा उभारण्यास गती येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर तातडीने निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ३ ते ४ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा भूमिपूजनाला स्वतः नगरविकास मंत्री येणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यपालांना विमानातून उतरवलं आता जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल’
- ‘मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंनी नारायण पाटलांना दिले कामाला लागण्याचे आदेश’
- राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी; सुधीर मुनगंटीवारांची मागणी
- श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ‘किरणोत्सव सोहळा’
- ‘कोहलीला ड्रिम इलेव्हनचा कॅप्टन करा आणि रहाणेला टीम इंडियाचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
