🕒 1 min read
नांदेड : शहरात शरद कुऱ्हाडे हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत कुऱ्हाडे यांच्या पत्नी व मुलानेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. शहरात सरपंच नगर येथे २०१९ मध्ये कुऱ्हाडे यांचा मृत्यु झाला होता. ९ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून झालेली व्यक्ती शरद कुऱ्हाडे हे दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नी व मुलानेच दोघांना एक लाखाची सुपारी दिली होती असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सरपंचनगर येथील शरद कुऱ्हाडे हा दारू पिऊन पत्नी अश्विनी व मुलगा आनंदला क्षुल्लक कारणावरून वाद घालून त्रास देत होता. तसेच राहते घर विक्री करणार होता. त्यामुळे त्याची पत्नी अश्विनी आणि मुलाने शुभम गायकवाड, विशाल गव्हाणे यांना एक लाख रुपयांची सुपारी दिली. १४ ऑगस्ट २०१९ रोजी सरपंचनगर येथील राहत्या घरी शरदच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला मारण्यात आले.
मृत शरद याच्या पत्नीचे व आईचे सारखे भांडण होत होते. या भांडणातून माझ्या मुलाला तुम्हीच मारल्याचे त्या सांगत होत्या. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार शवविच्छेदनाचा तिसरा अहवाल मागवल्यानंतर खून असल्याचे उघड झाले, असे पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी सांगितले. या प्रकरणात पत्नी, मुलगा व शुभम गायकवाड, विशाल गव्हाणे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक शेख यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. भाग्यनगर पोलिसांनी पत्नीला अटक केली असून मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या धर्तीवर आता इमिरेट्स टी-ट्वेन्टीचा लीगचा थरार
- एक दोन नव्हे तर तब्बल 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार
- ‘सध्या ‘सब घोडे बारा टके’ भावाने प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे’
- “झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता जनतेची माफी मागावी
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
