Share

विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची घोषणा ; श्रेयस अय्यर मुंबईच्या कर्णधारपदी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे यंदा जवळपास सर्वच क्रिकेट स्पर्धांना उशीर झाल्यामुळे रणजी करंडक रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी प्राधान्य देण्यात आले ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला. भारतात नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली. तमिळनाडूने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर आता विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला २० फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार असून १४ मार्च पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून पृथ्वी शॉ उपकर्णधार म्हणून भूमिका बजावणार आहे. या स्पर्धेसाठी 22 जणांचा संघ निवडण्यात आला आहे.

मुंबईचा संघ श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, अखिल हेरवाडकर, सूर्यकुमार यादव, सरफराज खान, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, आकाश पारकर, अतीफ अत्तरवाला, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजीत नायक, तनुश कोटीयन, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहीत अवस्थी.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!