Share

“इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1–0 अशी आघाडी मिळवली आहे.

अशातच भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सिरीजचं नाव तेंडुलकर-कुक सिरीज ठेवा, अशी मागणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने केली आहे. मॉन्टी पानेसरने त्याच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केल. ज्यामध्ये त्याने उभयतांमध्ये होणाऱ्या कसोटी सिरीजचं नाव तेंडुलकर-कुक सिरीज ठेवण्याची मागणी केली आहे. मॉन्टी पानेसरने केलेलं ट्विट खूपच व्हायरल होतंय. क्रिकेट फॅन्सही त्याच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

मॉन्टी पानेसरने बीसीसीआयला टॅग करत तेंडुलकरच्या खेळाचं महत्त्व आणि त्याच्या अफलातून इनिंग्जची आठवण करुन दिलीय. त्याने म्हटलंय, ‘ सचिन तेंडुलकरला आपण सगळेच क्रिकेटचा देव म्हणून ओळखतो. तेंडुलकरने भारतासाठी अनेक विस्मरणीय खेळी केल्या आहेत. परंतु आपल्याजवळ त्याच्या नावाची एकही सिरीज खेळली जात नाही. त्यामुळे आता इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं.

मॉन्टी पानेसरने केलेल्या मागणीवर काही चाहत्यांनी त्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे तर काही चाहत्यांनी मात्र त्याची फिरकी घेतलीय. ‘काही वर्ष थांबा या सिरीजचं नाव कोहली-रुटही असेल’, असं म्हणत एका चाहत्याने मॉन्टी पानेसरला चिमटा काढलाय. तर एका चाहत्याने मात्र मॉन्टीला उलटप्रश्न करत या सिरीजचं नाव कपील देव-बॉथम ठेवायला काय हरकत आहे, असा सवाल विचारलाय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!