🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेला संबोधित करताना कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली. देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत.
देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात’, अशा शेलक्या शब्दांत उपद्रव माजवणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.
आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटल्याने, त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. पंतप्रधानांच्या या शब्दावरून नवा वाद निर्माण झालाय. विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी यावर भाष्य केले आहे. दरम्यान, देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावर भाष्य केले आहे. ‘होय, मी आंदोलनजीवी आहे आणि त्याचा मला गर्व आहे’ असं म्हणत चिदंबरम यांनी मोदींवर पलटवार केला आहे. ‘मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे. सर्वोत्कृष्ट ‘आंदोलनजीवी’ हे महात्मा गांधी होते’, असे टि्वट चिदंबरम यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- ‘राणेंना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली’
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
