Share

…अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल चालवत गाठले कार्यालयात

Published On: 

🕒 1 min read

परभणी : माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी सायकलवर पोहोचले. या अभियानाअंतर्गत दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयसह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारीदेखील सायकलवर कार्यालयात येणार आहेत.

राज्य शासनाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता माझी वसुंधरा अभियान राबवले. राज्यात सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात ये-जा करण्यासाठी वाहनांऐवजी पायी, सायकल वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. कोणत्याही परिस्थितीत खासगी वाहनाचा वापर कटाक्षाने टाळावा. जेणेकरून वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हवेच्या गुणवत्ता, पर्यावरणामध्ये सुधारणा व्हावी, हाच उद्देश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

आता यापुढे दर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी-कर्मचारी वाहनांऐवजी सायकलने येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवून जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत अग्रस्थानी ठेवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!