मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं.
देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. त्यापासून देशातील जनतेने सावध राहायला हवं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे आंदोलनकर्ते वकिलांच्या आंदोलनात असतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात,’ असे मोदींनी म्हटले. ‘सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात,’ असा टोला मोदींनी लगावला आहे.
नरेंद्र मोदींच्या आंदोलनजीवी या शब्द प्रयोगानंतर विरोधी नेत्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच आंदोलनजीवी असल्याची टीका केली आहे. एखाद्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ असं म्हणून हिणवणं योग्य नाही. खुद्द भारतीय जनता पक्ष आजही प्रत्येक लहानसहान गोष्टींवर आंदोलन करतोय. त्यामुळं ‘आंदोलनजीवी’ कोण हे ठरवायचं झालं तर हा काटा भाजपकडेच वळतो,’ असा घणाघात भुजबळांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसुठ आंदोलन करत होते, त्यांना काय म्हणायचं ते आम्हाला आता कळलं’
- …म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या
- ‘खरे मोदी कोण? हा प्रश्न पंतप्रधानांनाच विचारायला हवा’
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
