Share

…म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या

Published On: 

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिली म्हणून स्थगिती सरकार अशी टीका भाजप नेते करत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र, आता थेट लोकसभेतच खासदार नवनीत कौर राणा यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख स्थगिती सरकार असा केला आहे.

‘महाराष्ट्रात 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्रात कृषीसंबंधी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे एके काळी सिंचनात मागे राहिलेला महाराष्ट्र सूक्ष्म सिंचनात टॉप पाचात येऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. ही योजना राज्यात यशस्वी झाली. या योजनेमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत 6 लाख प्रकल्प 22 हजार गावांत सुरु झाले. परंतु दुर्दैवाने ठाकरे सरकारने त्याला स्थगिती दिली,’ असं नवनीत राणा म्हणाल्या.

तर, ‘केंद्र सरकारची जी योजना आली, तिला आधी स्थगिती देण्याची परंपराच विद्यमान सरकारने सुरु केली. म्हणूनच त्यांना आम्ही स्थगिती सरकार असं नाव दिलं. मुंबई मेट्रो आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्राम सडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रील्ड, सीएम फेलोशिप, मुंबई पुणे हायपर लूप, नगरविकास आणि ग्रामविकासाच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे,’ असं म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!