🕒 1 min read
गडचिरोली : आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे खटके देखील उडालेले पाहायला मिळाले होते. त्यांची वारंवार होणारी बदली ही चर्चेची ठरत असते. मात्र, सद्या ते गडचिरोलीतील कामामुळे भारावले आहेत.
गडचिरोली हा जिल्हा दुर्गम भागांपैकी एक आहे. शासकीय योजना या ठिकाणी राबवणं हे मोठं धनुष्य पेलण्यासारखंच ! मात्र, याच दुर्गम भागात अशी काही घटना घडलीये की ज्याने सामन्यांना प्रचंड महत्वाचा उपयोग होणार आहे. दुर्गम भागात योग्य उपचार करणारे रुग्णालय नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आता याच गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या पुढाकाराने एखाद्या पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असं चकचकीत व सुसज्ज जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आलं आहे. हे रुग्णालय पाहिल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भरभरून कौतुक केलं आहे. हेच खरं यश आहे असं म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
तुकाराम मुंढेंनी केलेलं ट्विट –
हे गडचिरोलीचं जिल्हा रुग्णालय आहे यावर विश्वास ठेवा… अतिशय प्रेरणादायी आणि ग्रेट वर्क असं म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचं अभिनंदन केलं आहे. हा खरा मोलाचा वाटा… हे खरं यश… हे यश सर्व क्षेत्रांत मिळवण्यासाठी सर्वच स्तरांवर सहकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकष्ठा आवश्यक आहे, असं देखील मुंढे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.
This is Real contribution, Real Success . To make it happen in all walks of life , (not limited to islands of Excellence ! ) requires collaborative efforts at all levels .
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंड दुर्घटना : ‘या’ देशाने दर्शविली भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
