🕒 1 min read
नवी दिल्ली : देवभूमी उत्तराखंडवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोशली आहे. चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून देखील गेलेला आहे.
भीषण दुर्घटनेनात्र शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अजूनही जवळपास २०२ लोक बेपत्ता आहेत तर अनेकांचे संसार उद्योगधंदे उध्वस्त झाले आहेत. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र शासनाने बचावकार्यासाठी २० कोटींच्या अपत्कालीन निधीस मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान,उत्तराखंडमधील जोशीमठ तालुक्यात चमोली परिसरात मोठं नुकसान झालं आहे. हिमनग कोसळून खाली आल्यानं पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ होऊन जिल्ह्यातील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचा बांध फुटला आणि धौलगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका पाण्याच्या प्रवाहाजवळ असलेल्या गावांनाही बसलेला आहे.तसेच अनेक घरात पाणी शिरलं देखील शिरलं असल्याची माहिती मिळत आहे.
My thoughts are with the people of India and rescue workers in Uttarakhand as they respond to devastating flooding from the glacier collapse. The UK stands in solidarity with India and is ready to offer any support needed.
— Boris Johnson (@BorisJohnson) February 7, 2021
दरम्यान, या दुर्घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी एक लक्ष्यवेधी भूमिका घेतली आहे. कोरोना काळात भारताने मदत केल्याची जाणीव ठेवत बोरिस जॉनसन यांनी भारताला या संकट काळात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या आणि बचावकार्य करणाऱ्या जवानांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो या संकट काळात आम्ही भारताच्या सोबत मजबुतीने उभे राहू असे देखील ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कवी डॉ. बालाजी इंगळे यांच्या काव्यसंग्रहास उत्कृष्ट पुरस्कार
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
