मुंबई: रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमावेळी भाषण करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.
यावेळी भाजप कडून शिवसेनेवर सत्तास्थापनेत युतीधर्म न पाळल्याने टीकास्त्र सोडण्यात आले होते. तर यावेळी सत्तास्थापने वरून शिवसेनेवर सडकून टीका केली. तर शिवसेनेने देखील यावर पलटवार केला आहे. दरम्यान आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा संधान साधले आहे.
‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले आहे . त्यांना शुभेच्छा व मानसिक शांततेसाठी प्रार्थनेचे बळ देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो ? महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले व सुरूच आहेत , ते नाकाम होतील . या प्रयत्नांत घटनात्मक पदावरील राज्यपालांची अप्रतिष्ठा केली गेली . महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. या सर्व प्रकारात तुमचेच वस्त्रहरण झाले आहे . कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले . ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’ असा घणाघात आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून या भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले’
- पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी, पतीस तीन दिवसांची कोठडी
- परभणीचा पारा घसरला; तापमान 8.7 अंश सेल्सियसवर
- औरंगाबादेत उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्घाटन
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
