औरंगाबाद : महिला आर्थिक विकास महामंडळ औरंगाबाद तसेच बिबी फातेमा लोकसंचलित संचलित साधन केंद्र, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमा अंतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण उदघाटन सोहळा बळवंत वाचनालय येथे ज्योती ठाकरे अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.्र
ह्या प्रशिक्षणा द्वारे उद्योजकता विकास प्रशिक्षण देऊन महिलामधील उद्योजकीय गुण विकसित करणे. त्यांच्यात उद्योगाविषयी क्षमता विकसित करणे. त्यांच्यातील व्यवहार. व्यवसायिक संकल्पना स्पष्ट करणे. तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
सोमवार – बुधवार (८ ते १०) वाचनालय औरंगाबाद येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर माालाना आझाद रिसर्च सेंटर व्हिआयपी रोड येथे महिला उद्योजकांना तसेच नवउद्योजकांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. याव्दारे विविध शासकीय विभागामार्फत कनव्हर्जनच्या माध्यमातून लाभ मिळवून देणे, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला योग्य बाजार भाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पादनाचे कौशल्य विकसित करणे, असा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्धेश असल्याचे या वेळी सांगितले.
या कार्यक्रमास ज्योती ठाकरे, विजय डोके, आयशा शेख, नगरसेविका मीनाताई खरात, राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक विजय डोके यांनी केले, तर सूत्रसंचालन नेमान खान यांनी केले. आभार चंद्रशेखर हिंगोले यांनी मानले. कार्यक्रम यशश्वी होण्याकरिता CMRC व्यवस्थापक शारदा काळवे, सीएमआरसीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार – प्रा. मच्छिंद्र सकटे
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी


