🕒 1 min read
परभणी : वसमत रस्त्यावरील भाग्यलक्ष्मीनगरात पती – पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी घडली. गंभीर जखमी असलेल्या पत्नी स्नेहल टाकला नांदेडच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी नवामोंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पती सुनील टाक याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना दोन अपत्यही असल्याची माहिती आहे. या पती – पत्नीमध्ये काही कारणावरून वाद होत होते. सततच्या या वादामुळे स्नेहल ही तीन महिन्यांपासून भाग्यलक्ष्मीनगरमध्ये वडीलांच्या घरी रहायला आली होती. रविवारी सुनील टाक हा भाग्यलक्ष्मीनगरात शहाणे यांच्या घरी गेला. तेथे रविवारी दुपारी पती – पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. जुन्या भांडणाच्या कारणातून सुनील टाक याने पत्नीवर चाकूने वार केले. यात पत्नी स्नेहल गंभीर जखमी झाली.
तिच्यावर परभणीत प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने नांदेड येथे उपचारार्थ हलवले. पती सुनीलला नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमीत शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील टाकने चाकूने वार करत स्नेहलला जबर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुनील टाक यास सोमवारी नवामोंढा पोलीस ठाण्याचे फौजदार शैलेश जाधव यांनी न्यायालयासमोर सुनील टाक यास हजर केले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती फौजदार शैलेश जाधव यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार – प्रा. मच्छिंद्र सकटे
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
