🕒 1 min read
उस्मानाबाद : निसर्गाचा प्रकोप कमी व्हावा म्हणुन अनेक उपाय योजले जातात. वृक्षलागवड हा त्याचाच भाग. दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वनराई फुलवण्यासाठी वृक्ष लागवड केली जाते. पण त्यांच्या संवर्धनाकडे मात्र तितके लक्ष दिले जात नाही. एक दिवस आधी उत्तराखंड येथील प्रलय संपुर्ण देशाने पाहीला आहे. या दरम्यान काही दिवसापुर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात वनराईत आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. उमरगा तालुक्यातील कुन्हाळी शिवारातील वनक्षेत्रात मुख्य विद्युत वाहिनीत घर्षणाने ४ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. या आगीत दोन हेक्टर क्षेत्रातील गवत व वृक्ष आगीच्या विळख्यात आले तर रोपांना आगीची झळ बसल्यामुळे कोमेजून गेले आहेत.
जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करण्यात येते. एकीकडे शासन वृक्षलागवडीवर भर देत असताना तालुक्यातील संबंधित विभागाचे मात्र संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. झाडांची देखभाल करता येत नसेल तर वृक्ष लागवड का केली जाते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.शिवारात सर्व्हे नंबर १३३ मध्ये दोन हेक्टर क्षेत्रात वन क्षेत्र असून गुरुवारी दुपारी अडीच वाजता विद्युत वाहिन्यामध्ये घर्षण होऊन आग लागली. दुपारी अडीच वाजता लागलेली आग तब्बल एक तास आटोक्यात आली नाही.
अखेर अग्निशमन दलास पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. परिसरातील शेतकरी व नागरिक आग पूर्णतः विझवण्यासाठी सायंकाळपर्यंत थांबले होते.मात्र, अधूनमधून वारा सुरू झाल्याने आग पुन्हा भडकत होती. जंगलात आग लागल्याची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी राजू शिपे, वनपाल दयानंद निलंगेकर, वनरक्षक टी. ए. डिगोळे, वनमजूर माधव कुकुर्डे, गोविंद बोळेगावे, कैलास आष्टे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांनी प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार – प्रा. मच्छिंद्र सकटे
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
