🕒 1 min read
परभणी : डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड कुक्स चॅलेंज 2021 या डॉ. कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टीन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या प्रक्षेपण प्रकल्पात परभणीच्या सात विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
परभणीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 7 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे देशभरातील बालवैज्ञानिकांनी आपले अंतराळ प्रक्षेपण प्रयोग सादर केले. परभणीतील केएनपी इन्स्टीट्युटच्या सात बालवैज्ञानीकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. जागतीक विक्रमाला गवसणी घातली आहे. राज्यभरातील 398 विद्यार्थ्यांनी 39 उपग्रह बनवून सिंहाचा वाटा उचलला. यात परभणीतील बालविद्या विहारचा युवराज राजकुमार भांबरे, संस्कृती विद्यानिकेतनचे कल्पेश पत्की, कल्पना पत्की, सीमा कॉलेजचा आदिज्य चौधरी, सेंट ऑगस्टीनचा अक्षद चौधरी, बालविद्या मंदिराची वेदीका कुल्थे, केंद्रीय विद्यालयाची अनन्या चौधरी या सात विद्यार्थ्यांनी परभणीचे नाव उज्ज्वल केले.
त्यांना केएनपी संस्थेचे डायरेक्टर मेघशाम पत्की यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बाल वैज्ञानिकांनी दिल्ली ते कन्याकुमारी पर्यंतच्या विविध वैज्ञानिक प्रयोगात परभणीचा झेंडा रोवला आहे. हे यशस्वी विद्यार्थी मंगळवारी (दि. ९) रात्री परभणीत येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर, अरुण पवार यांनी तयारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार – प्रा. मच्छिंद्र सकटे
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
