🕒 1 min read
परभणी : शहरासह जिल्ह्यात तीन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच खाली येऊ लागला आहे. बोचऱ्या थंडीमुळे परभणीकर चांगलेच हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळचे तापमान 8.7 अंशावर आले होते.
कमाल 28.4 इतक्या अंशाची नोंद झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. या थंडीमुळे अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन असे होते.
परंतू, फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. रविवारी परभणीचा पारा 10.8 अंशांची नोंद झाली होती. तर सोमवारी तर तापमानाचा पारा त्याहीपेक्षा खाली गेला. शनिवारी (दि. सहा) 15.7, शुक्रवारी (दि. पाच) 11.3, गुरुवारी (दि. चार) 10.2, बुधवारी (दि. ३) 9.1 तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करणार – प्रा. मच्छिंद्र सकटे
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
