नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही अस पंतप्रधान म्हणाले आहेत. तर एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं आहे.
या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील भाष्य केले आहे. मी सुधारणेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. शरद पवार यांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला विरोध केला नाही अस मोदी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय संघ २४१ धावांनी पिछाडीवर; पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात
- हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी सुर्यभानजी पवार यांचे निधन
- भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
- ‘या’ संघात मिळू शकते अर्जुन तेंडुलकरला संधी?
- ज्या कॉंग्रेसने सचिनला ‘भारतरत्न’ दिला आता त्याच कॉंग्रेसच्या खासदाराने काढली सचिनची लायकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
