Share

‘या’ संघात मिळू शकते अर्जुन तेंडुलकरला संधी?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अर्जुन तेंडुलकर या लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल.

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल.

राजस्थान रॉयल्स 

अर्जुनने मुंबई क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज तसंच अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत अर्जुन मुंबईच्या संघातून खेळला होता. राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघात सध्या जोफ्रा आर्चर हा परदेशी वेगवान गोलंदाज तर देशी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आहे. जर संघाला आणखी एका डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान द्यायचं असेल तर कदाचित अर्जुनला संधी मिळू शकते.

मुंबई इंडियन्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे आणि अजूनही तो संघाशी संबंधित आहे. त्यामुळे कदाचित मुंबईचा संघ अर्जुनला घेऊ शकेल.

बेंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने 2021 लिलावापूर्वी उमेश यादव आणि इसरू उडाना या दोन खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. डेन स्टेन या आयपीएलमध्ये खेळणार नाही. मग कर्णधार विराटच्या बेंगळुरू संघात मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे विराट कदाचित अर्जुन तेंडुलकरला घेऊन आपल्या संघाचं गोलंदाजी डिपार्टमेंट मजबूत करेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!