Share

हिंगोलीत उगवली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी; ८० हजाराचे मिळाले उत्पादन

Published On: 

हिंगोली: महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी ही तितकेच प्रसिध्द आहे. याच स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याची कमाल मराठवाड्यातील हिंगोली येथील शेतकऱ्यांने केली आहे. दोन गुंठ्यांमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग सेनगाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी नितीन नायक यांनी केला आहे आणि या स्ट्रॉबेरी उत्पादनातून त्यांनी ८० हजार रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

व्यवसायाने शेतकरी असलेले नितीन प्रभाकर नायक हे तीन वर्षांपूर्वी महाबळेश्वर परिसरामध्ये गेले होते. त्याठिकाणी थंड वातावरणात येणाऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग त्यांनी पाहिला. यानंतर सवना येथील वातावरण व महाबळेश्वर येथील वातावरणातील साम्य नितीन नायक यांनी लक्षात घेतले. त्यानुसार सवना येथेही स्ट्रॉबेरी लागवड करता येऊ शकते असे त्यांच्या लक्षात आले. मात्र खबरदारीचा ऊपाय म्हणुन मात्र पाच एकर शेती असताना स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग त्यांनी केवळ दोन गुंठ्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

नंतर त्यांनी पाचगणी येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. नोव्हेंबर महिन्यात रोपांच्या लागवडीनंतर फवारणी, पाणीपाळी याकडे लक्ष दिले. अवघ्या दोन महिन्यांत स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले. जानेवारी महिन्यापासून त्यांनी स्ट्रॉबेरी तोडणी करून स्थानिक बाजारपेठेत विक्रीला सुरुवात केली. अवघ्या दीड महिन्यात त्यांनी एक क्विंटल ६० किलो स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे. त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून आणखी पंधरा ते वीस दिवस स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पुढील काळात स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!