🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. अमित शाहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.
उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नेमकं अमित शाह व त्यांच्यामध्ये बंद खोलीत काय झालं होतं याच्या दुसऱ्या बाजूवर अमित शाह यांनीभाष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे.
भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाची शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं. असं अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलंय. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
अरविंद सावंत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वचन दिलं होतं की नाही, हे सांगायला शहा यांना सव्वा वर्ष लागलं. यातच कळतंय पाणी किती मुरलंय. ठाकरे कुटुंब नेहमीच खरं बोलतं. त्यावेळेस जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शहांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला का गेले? मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत? असा सवालही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- सुराणानगरातील कार्यालय फोडून संगणक चोरणारा गजाआड
- महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवणं चुकीचं – पालकमंत्री धनंजय मुंडे
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
