Share

सुराणानगरातील कार्यालय फोडून संगणक चोरणारा गजाआड

Published On: 

औरंगाबाद : सुराणानगरातील महिलेचे कार्यालय फोडून दोन संगणक लांबवलेल्या चोराला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. ईश्वर महादेव गावडा (वय २८, रा. सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळ) असे त्याचे नाव आहे.

स्मिता अमोल झाल्टे (रा. प्लॉट क्र. १८, सुराणानगर) यांच्या मालकीचे बाईट झेड इन्फोटेक कॉम्प्युटर हे कार्यालय १३ ते १६ जानेवारीदरम्यान फोडून गावडा याने दोन संगणक लांबवले होते. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

६ फेब्रुवारी रोजी दुपारी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक वसंत शेळके, जमादार गजेंद्र शिंगाणे, मनोज अकोले, पोलीस नाईक प्रदीप दंडवते, पोलीस नाईक विजय वानखेडे हे दुचाकी चोरांचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या बाजुला अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी पथकाने छापा मारुन ईश्वर गावडा याला पकडले. त्यावेळी जिन्याखाली लपवून ठेवलेले दोन संगणक जप्त करण्यात आले. गावडाला सध्या जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!