🕒 1 min read
उत्तराखंड : देवभूमी उत्तराखंडवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोशली आहे. चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
तर, ऋषीगंगा प्रोजेक्टचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.
जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसाना झालं आहे. हिमकडा कोसळल्यानंतर चमोली जिल्ह्यात आलेल्या पुरात १००-१५० नागरिक वाहून जाऊन दगावल्याची शक्यता असल्याचं उत्तराखंडाचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटलंय.
दरम्यान, ‘चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.’ अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
