मुंबई : नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘दिल’. अभिनेता आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी तुफान गाजला होता. केवळ हा चित्रपटच नव्हे तर, या चित्रपटातील गाणी देखील तितकीच लोकप्रिय ठरली होती. दरम्यान आता हा चित्रपट पुन्हा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी ‘दिल’चा रिमेक काढणार असल्याचं सांगितलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा दिल पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या रिमेकविषयी कोणतीच माहिती अद्याप समोर आली नसून यात नेमके कोणते कलाकार झळकणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.
सध्या इंद्र कुमार ‘थँक गॉड’ या चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर इंद्र कुमार ‘दिल’च्या रिमेककडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
